नेतन्याहूंना खटला न चालवता गोळ्या घातल्या पाहिजेत, काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 04:10 PM2023-11-18T16:10:55+5:302023-11-18T16:12:30+5:30

Israel-Hamas war: हमासने भ्याड हल्ला करून शेकडो इस्राइली नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्राइलने गाझा पट्टीतील हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. गेल्या महिनाभरापासून इस्राइलने गाझावर भीषण हल्ला सुरू असून, यात हमासच्या दशतवाद्यांबरोबरच गाझामधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Hamas war: Netanyahu should be shot without trial, says senior Congress MP | नेतन्याहूंना खटला न चालवता गोळ्या घातल्या पाहिजेत, काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदाराचं विधान

नेतन्याहूंना खटला न चालवता गोळ्या घातल्या पाहिजेत, काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदाराचं विधान

हमासने भ्याड हल्ला करून शेकडो इस्राइली नागरिकांची हत्या केल्यानंतर इस्राइलने गाझा पट्टीतील हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. गेल्या महिनाभरापासून इस्राइलने गाझावर भीषण हल्ला सुरू असून, यात हमासच्या दशतवाद्यांबरोबरच गाझामधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्राइलच्या या कारवाईला विरोधही होत आहे. केरळमधील कासरगोड येथे पॅलेस्टाइन एकजुटता रॅलीमध्ये काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात एक वादग्रस्त विधान केलं आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर कुठलाही खटला न चालवता त्यांची गोळ्या झाडून हत्या केली पाहिजे, असं विधान राजमोहन यांन केलं आहे.

काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन म्हणाले की, जर तुम्ही विचारत असाल की, जिनेव्हा कन्व्हेशनच्या सर्व करारांना तोडणाऱ्यांबाबत काय केलं गेलं पाहिजे, तर दुसऱ्या महायुद्धानंतर युद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींसाठी नूर्नबर्ग ट्रायल हे एक असे पाऊल होते, ज्यानुसार कुठल्याही परीक्षणाशिवाय गोळी मारली पाहिजे.

त्यांनी सांगितले की, आता वेळ आली आहे की, नूनबर्ग मॉडेलचं परीक्षण केलं गेलं पाहिजे. बेंजामिन नेतन्याहू जगासमोर युद्ध गुन्हेगार म्हणून उभे आहेत. नेतन्याहू यांच्यावर कुठलाही खटला न चालवता त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याची वेळ आली आहे. कारण ते तिथे अशाप्रकारचं क्रौर्य करत आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेसचे नेते उन्नीथन यांनी सांगितले की, गाझापट्टीवर राज्य करणारी इस्लामिक संघटना हमासने आपली जमीन, जनता आणि जीवनाच्या संरक्षणासाठी हत्यार हातात घेतले आहे. ते दहशतवादी नाहीत. जर कुणी हमासला दहशतवादी म्हणून दाखवत असेल.  तर त्यांच्याविरोधात परखड प्रतिक्रिया व्यक्त करण्याची वेळ आली आहे. कासरगोडमध्ये पॅलेस्टाइन ऐक्य रॅली आणि प्रार्थना सभेमध्ये उन्नीथन बोलत होते.  

Web Title: Israel-Hamas war: Netanyahu should be shot without trial, says senior Congress MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.