इस्रायल आणि हमास गटामध्ये एक महिन्याहून अधिक दिवस भयंकर युद्ध सुरू आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यांनी इस्रायली नागरिकांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली आणि 1400 लोकांना ठार केले. याशिवाय हमासच्या लोकांनी शेकडो इस्रायली नागरिक आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले. इस्रायलमध्ये हमासने हल्ल्यानंतर लगेचच युद्ध घोषित करण्यात आलं आणि गाझा पट्टीवर वेगाने हवाई हल्ले सुरू केले. या 33 दिवसांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 11 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 27 हजार लोक जखमी झाले आहेत. या काळात अनेक देशांनी युद्धविरामाची मागणीही केली, मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू याच्या बाजूने नाहीत. हमासचा नाश होईपर्यंत आपण थांबणार नाही, असे ते स्पष्टपणे सांगतात.
इस्रायलने हमासच्या वेपन आणि वॉर मशीन डिपार्टमेंटचा हेड महसन अबू-जिनाला बुधवारी (8 नोव्हेंबर) ठार केल्याचा दावा केला आहे. इस्रायल-हमास युद्धाविरोधात जगभरात निषेध आंदोलनेही सुरू आहेत. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या वेपन स्टोरेजवर F15 फायटर जेटनी हल्ला करून सुमारे 9 जणांना ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
यावर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले की, अमेरिका आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी काहीही करेल. इराण समर्थित गटाने अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोनने हल्ला केला होता, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने कारवाई केली. युद्धामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे.
IDF चे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी माहिती दिली की बुधवारी (8 नोव्हेंबर) अंदाजे 50,000 गाझाचे लोक उत्तरेकडील भागातून दक्षिणेकडे गेले आहेत. पॅलेस्टिनी निर्वासितांना समर्पित यूएन एजन्सीने सांगितले की 7 ऑक्टोबरपासून UNRWA चे 99 कर्मचारी मारले गेले आहेत आणि किमान 26 जखमी झाले आहेत. युनायटेड नेशन्सच्या इतिहासातील कोणत्याही संघर्षात UN मदत कर्मचार्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.