ऑपरेशन अजय अंतर्गत, इस्रायलहून २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. इस्रायलमधून येणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह विमानतळावर उपस्थित होते. २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून निघाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे.
भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २३० प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान शुक्रवारी सकाळी भारतात पोहचेल. या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.
तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
येथे भारतीय परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इस्रायलने हमासपाठोपाठ सीरियावरही हल्ला केल्याने युद्धाचा भडका आणखी वाढण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळांच्या रनवेचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका का केला याबाबत इस्रायलने माहिती दिलेली नाही.