आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 10:10 PM2023-10-09T22:10:55+5:302023-10-09T22:11:29+5:30

आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली, यात पक्षाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे.

Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

googlenewsNext

Israel-Palestine: इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव गेले असून असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर भारताने इस्रायलला पाठिंबा दिला आहे, मात्र काँग्रेसने पॅलेस्टाईन नागरिकांचे समर्थन केले आहे.

आज काँग्रेस कार्यकारिणी बैठक पार पडली. आधी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या काँग्रेसने वेगळाच भूमिका घेतली आहे. या बैठकीत काँग्रेसने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. दोन्ही देशांनी तत्काळ युद्धविराम द्यावा. पॅलेस्टिनी लोकांची जमीन, स्व-शासन आणि अधिकारांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 

हमासच्या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू
दहशतवादी संघटना, हमासने शनिवारी इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागले होते. या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे, यामध्ये हमासची 800 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच, यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.