इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:27 PM2024-05-31T21:27:10+5:302024-05-31T21:28:51+5:30
इस्रायली फर्मने लोकसभा निवडणुकीत अडथळा निर्माण करणे आणि भाजपविरोधी अजेंडा चालवल्याचा दावा यात करण्यात आला आहे.
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या अन् सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे, तर निकाल 4 जूनला लागेल. तत्पूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी OpenAI ने मोठा दावा केला आहे. इस्रायली फर्मने लोकसभा निवडणुकीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपविरोधी अजेंडाही चालवला. इस्रायल आधारित कंपनीने भारतावर लक्ष केंद्रित करुन सत्ताधारी भाजपवर टीका आणि विरोधी पक्षाची प्रशंसा केल्याचे यात म्हटले आहे.
OpenAI च्या रिपोर्टमध्ये अशा कॅम्पेन्सचा उल्लेख आहे, ज्यात AI चा वापर जनमतामध्ये फेरफार करण्यासाठी किंवा राजकीय परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठी केला गेला. तसेच आमच्या मॉडेलचा वापर अशा धोकादायक कामांसाठी केला जात असल्याचेही आम्हाला आढळून आले आहे. ही कंपनी STOIC या इस्रायली राजकीय प्रचार व्यवस्थापन फर्मद्वारे चालवली जात होती.
It is absolutely clear and obvious that @BJP4India was and is the target of influence operations, misinformation and foreign interference, being done by and/or on behalf of some Indian political parties.
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳(Modiyude Kutumbam) (@Rajeev_GoI) May 31, 2024
This is very dangerous threat to our democracy. It is clear vested… https://t.co/e78pbEuHwe
या रिपोर्टनुसार, इस्रायलवरुन चालणाऱ्या अकाउंट्सच्या एका ग्रुपचा वापर सीक्रेट कॅम्पेनसाठी कॉन्टेंट बनवणे आणि याला एडिट करण्यासाठी केला. हा कॉन्टेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, फेसबुक, इंस्टाग्राम, वेबसाइट आणि यूट्यूबवर शेअर करण्यात आला होता. मे महिन्याच्या सुरुवातीलाच याने इंग्रजी कॉन्टेंटसोबत भारतीयांना टार्गेट करणे सुरू केल्याचा दावाही OpenAI ने केला आहे.
भाजपची प्रतिक्रिया
दरम्यान, OpenAI च्या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आता हे स्पष्ट झाले आहे की, काही राजकीय पक्षांकडून किंवा त्यांच्याकडून चालवल्या जात असलेल्या चुकीच्या माहिती आणि परदेशी हस्तक्षेपाद्वारे भाजपला टार्गेट केले जात आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. असा अजेंडा भारतात आणि देशाबाहेर निहित स्वार्थासाठी चालवला जात आहे. याची सखोल चौकशी करुन पर्दाफाश होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले