श्रीहरीकाेटा : भारताचे चंद्रयान एकीकडे चंद्राच्या आणखी जवळ पाेहाेचले आहे. तर, दुसरीकडे सूर्याकडे जाण्यासाठी इस्राेने जाेरदार तयारी केली आहे. लवकरच ‘आदित्य एल-१’ नावाचे यान अंतराळात पाठविण्यात येईल. ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ‘आदित्य एल-१’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय माेहीम राहणार आहे. लाॅंचिंगनंतर ४ महिन्यांनी ते सूर्य आणि पृथ्वीमधील लॅगरेंज पाॅइंट -१ या ठिकाणी पाेहाेचेल. या ठिकाणी ग्रहणाचा प्रभाव पडत नाही. तसेच सूर्याचा अभ्यास करण्यात अडचणही येणार नाही. १५लाख किलाेमीटर अंतरावर आहे लॅंगरेंज पाॅइंट.
‘आदित्य एल-१’ काय करणार ?
साैर हालचाली आणि त्यांचा अंतराळातील वातावरणावरील हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास. इलेक्ट्राेमॅग्नेट व मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टरच्या माध्यमातून फाेटाेस्फिअर, क्राेमाेस्फिअर व सूर्याच्या बाह्य आवरणांचा अभ्यास करणार. ७ पेलाेड यान नेणार आहे. त्यापैकी ४ पेलाेड थेट सूर्याचा अभ्यास करतील. ३ पेलाेड इतर माहिती गाेळा करतील. साेलर काेराेना आणि उष्णता निर्मितीच्या यंत्रणेचा अभ्यास करेल.
लॅगरेंज पाॅइंट म्हणजे काय?
- हे स्थान असे आहे जिथे काेणतीही वस्तू ठेवल्यास ती तेथेच कायम राहील. एकप्रकारे अढळ स्थान आहे.- ग्रहणाचा परिणाम हाेत नाही. काेणत्याही अडचणीविना सूर्याचा अभ्यास केला जाऊ शकताे.