इस्त्रोने या वर्षात मोठी झेप घेत चंद्रयान 3 यशस्वी केले. चंद्रावरील अनेक नव्या घडामोडी जगाला दिल्या. विज्ञानाच्या जगात भारताची सतत प्रगती होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आणखी एका मोठ्या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. याबाबत इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गुरुवारी माहिती दिली. एस सोमनाथ म्हणाले की, भारताने गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी पुढील पाच वर्षांत ५० उपग्रह सोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, तामिळनाडूचे कारागीर देताहेत आकार
एस सोमनाथ म्हणाले की, यामध्ये सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची आणि हजारो किलोमीटर क्षेत्राचे फोटो घेण्याची क्षमता असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये उपग्रहांचा थर तयार करणे समाविष्ट असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेच्या वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम 'टेकफेस्ट'ला संबोधित करताना, सोमनाथ म्हणाले की, बदल शोधणे, डेटाचे विश्लेषण करणे, एआय-संबंधित आणि डेटा-चालित प्रयत्नांसाठी उपग्रहांची क्षमता वाढवणे महत्त्वाचे आहे.
"भारताचे एक मजबूत राष्ट्र बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, उपग्रह ताफ्याचा सध्याचा आकार पुरेसा नाही आणि तो "आजच्या तुलनेत दहापट" असावा. स्पेसशिप देशाच्या सीमा आणि शेजारच्या भागावर लक्ष ठेवण्यास सक्षम आहेत, असंही एस सोमनाथ म्हणाले.
"आम्ही पुढील पाच वर्षांत ५० उपग्रह एकत्र केले आहेत ते भारतासाठी विशेष भू-गुप्तचरला मदत करतील. जर भारत या पातळीवर उपग्रह प्रक्षेपित करू शकतो. तर देशासमोरील धोके अधिक चांगल्या पद्धतीने कमी करता येतील, असंही एस सोमनाथ म्हणाले.