शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
5
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
6
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
7
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
8
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
9
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
10
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
11
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
12
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
13
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
14
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
18
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
19
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

ISRO Launch of SSLV-D3 : इस्रोनं इतिहास रचला, EOS-8 सॅटेलाइट लॉन्च, होणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:56 AM

इस्रोचे SSLV-D3 रॉकेट लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे, कारण...

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:17 वाजता पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून SSLV-D3 रॉकेट लॉन्च केले. या मिशनअंतर्गत देशाचे नवे अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट EOS-8 आणि एक छोटे सॅटेलाइट SR-0 DEMOSAT लॉन्च केले. हे दोन्ही सॅटेलाइट्स पृथ्वीपासून सुमारे 475 किलोमीटर एवढ्या उचीवर असलेल्या गोलाकार कक्षेत स्थापित केले जातील. इस्रोचे हे लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे.

इस्रोचे SSLV-D3 रॉकेट लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे, कारण हे दोन महत्वाचे सॅटेलाइट्स, EOS-8 आणि SR-0 DEMOSAT ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी एक महत्वाचे मिशन आहे. हे SSLV चे तिसरे लॉन्चिंग आहे आणि भारताच्या छोट्या सॅटेलाइट लॉन्च उद्योगासाटी एका मैलाचा दगड सिद्ध होऊ शकते. या शिवाय, EOS-8 आणि SR-0 DEMOSAT च्या यशस्वी लॉन्चिंग आणि ऑपरेशनमुळे अंतराळ तंत्रज्ञानात भारताची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल. हे जागतिक अंतराळ स्पर्धेत एक महत्वाचे योगदान असेल.

शेती, वन्यजीव आणि आपत्तीमध्ये मदत मिळेल -SSLV-D3 रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 500 किलोग्रॅमपर्यंतच्या सॅटेलाइट्सना 500 किलोमीटर अथवा 300 किलोग्रॅमच्या सॅटेलाइट्सना सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पाठवू शकते. या ऑर्बिटची उंची 500 किलोमीटरच्या वर असते. या लॉन्चिंगमध्ये हे 475 किलोमीटरच्या ऊंचीपर्यंत जाईल. तेथे गेल्यानंतर ते सॅटेलाइटला सोडेल. EOS-8 सॅटेलाइट: हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे, याचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे आणि महत्त्वपूर्ण डेटा गोळा करणे, असा आहे. याच्या सहाय्याने कृषी, वन्यजीव निरीक्षण, जलस्रोत व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्येही मदत होईल.

SR-0 DEMOSAT :  हे एक छोटे सॅटेलाइट आहे. जे पॅसेन्जर सॅटेलाइट म्हणून पाठवले जात आहे. नवीन तांत्रिक चाचण्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत