भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शनिवारी मोठा खुलासा केला. एस सोमनाथ म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज १०० हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. कोची, केरळ येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर परिषद सुरू आहे. यावेळी एस सोमनाथ बोलत होते.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा
एस सोमनाथ म्हणाले, अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिप्सच्या वापराने चालणाऱ्या रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्यांची क्षमता खूप जास्त आहे.'अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी मजबूत सायबर सुरक्षा नेटवर्कने सुसज्ज आहे. केरळ पोलीस आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिसर्च असोसिएशनने येथे या परिषदेचे आयोजन केले होते हे विशेष.
'सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध चाचण्यांवरही इस्रो पुढे जात आहे. पूर्वी एका वेळी एका उपग्रहावर नजर ठेवली जात होती, पण आता एकावेळी अनेक उपग्रहांवर नजर ठेवली जाते. यावरून या क्षेत्राची वाढ दिसून येते, असंही एस सोमनाथ म्हणाले.
एस सोमनाथ म्हणाले की, सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात मदत करणारे उपग्रह देखील आहेत, जे सायबर हल्ल्यांच्या अधीन आहेत. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. या सर्वांचे रक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.