ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 20 - गेल्या काही दिवसांपूर्वीच जीएसएलव्ही मार्क- 3 (GSLV MK III)च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो पीएसएलव्ही या स्वदेशी उपग्रहासह विविध देशांचे आणखी 31 उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. इस्रोचा पीएसएलव्ही हा उपग्रह स्वताःसोबत 31 छोटे उपग्रह घेऊन शुक्रवारी अवकाशात उड्डाण करणार आहे. या छोट्या उपग्रहांमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फ्रान्स, फिनलँड अशा 14 देशांचे जवळपास 31पैकी 29 उपग्रहांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एक नॅनो उपग्रहसुद्धा आकाशात उड्डाण करणार आहे.
इस्रोचे पीएसएलव्ही हा उपग्रह 14 देशांचे 29 छोटे उपग्रह, भारताचे कार्टोसॅट-२ ई आणि तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह घेऊन अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरीकोटा येथील लाँचपॅडवरून शुक्रवारी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युरोप आणि अमेरिका अशा 14 देशांच्या 29 छोट्या उपग्रहांचा मोहिमेत सहभाग असणार आहे. कार्टोसॅट-२ई या भारतीय उपग्रहाचे वजन 712 किलो आहे. कार्टोसॅट- 2 या मालिकेतील हे सहावे उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रांचा वापर नकाशा तयार करण्याच्या कामासाठी केला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण किनारपट्टीजवळील जमिनीचे नियमन आणि देखरेख करण्यासाठीह या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.