भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने हवामानाची अचूक माहिती देणारा INSAT-3DS हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या प्रक्षेपणाबरोबरच भारताने पुन्हा एकदा अंतराळात आपला डंका वाजवला आहे. INSAT-3DS हवामान उपग्रह शनिवारी जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल (GSLV) रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला.
हवामानविषयक अचूक माहिती देणे, हवामानाचा अंदाज, जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण आणि आपत्ती संदर्भात माहिती देणे, उपग्रहाच्या सहाय्यने संशोधन आणि बचाव सेवा प्रदान करणे हा INSAT-3D आणि INSAT-3DR उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा उद्देश आहे.
हा उपग्रह श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून सायंकाळी 5.35 वाजता जीएसएलव्ही रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आला.इसरोने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जियोसिन्क्रोनस लॉन्च व्हीकल (जीएसएलवी) रॉकेटने इनसॅट-3डीएस हवान उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून शनिवारी संध्याकाळी 5:35 च्या पूर्व नियोजित वेळेवर उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
सायंकाळी 5:35 वाजता प्रक्षेपित करण्यात आला उपग्रह -महत्वाचे म्हणजे, शुक्रवारी दुपारी 2:30 वाजत याची उलटी गिनती सुरू झाली होती. साधारणपणे 20 मिनिटांच्या उड्डाणानंतर, 2,274 किलो ग्रॅम वजनाचा उपग्रह भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (इनसॅट) जीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाला.