बंगळुरू : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (इस्रो) ॲनालॉग अंतराळ मोहिमेला लडाखमधील लेह येथून प्रारंभ झाला असल्याचे त्या संस्थेने शुक्रवारी जाहीर केले. भारताची ही पहिली ॲनालॉग मोहीम असून, त्यासाठी आयआयटी मुंबईसह अनेक संस्थांनी सहकार्य केले आहे. भारताच्या चंद्रावर मानवाला पाठविण्याच्या प्रयत्नात ही माेहीम महत्त्वाची ठरणार आहे.
इस्रोने यासंदर्भात सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, पृथ्वीच्या कक्षेपलीकडे असलेल्या बेस स्टेशनमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेसाठी एएकेए स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद या संस्थांनीही सहकार्य केले. बेस स्टेशनमधील अंतराळवीरांचा निवास आदी गोष्टींसाठी या मोहिमेतील अभ्यास उपयोगी ठरणार आहे.