शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

नवा इतिहास रचण्यासाठी इस्रो सज्ज !

By admin | Published: April 20, 2017 2:28 PM

भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्त्रो)च्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 20 - भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्त्रो)च्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. इस्रो पहिल्यांदाच चार टन वजनाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचा तयारीत असून, मे महिन्यात या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोनं आतापर्यंत 2.2 टन वजनापर्यंतचे उपग्रह वाहून नेणारी क्षमता असलेले रॉकेट अवकाशात सोडले आहेत. मात्र त्याहून अधिक वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी परदेशी लाँचिंग रॉकेटचा वापर करण्यात येत होता. पुढच्या महिन्यात इस्त्रोच्या श्रीहरिकोटा या अवकाश केंद्रातून हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. किरण कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले, चार टन वजनाच्या उपग्रहाचे नाव जीएसएलव्ही-एमके 3डी असून, पुढच्याच महिन्यात ते प्रक्षेपित करण्यात येणार आहे. ही मोहीम फत्ते झाल्यास भारताला जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी परदेशी बनवटीच्या रॉकेटवर अवलंबून राहावं लागणार नाही. तसेच भारत आता 4 टन वनजाच्या उपग्रहांच्या निर्मितीवरही लक्ष्य केंद्रित करत असून, ही मोहीम यशस्वी झाल्यास मागील वर्षभरात इस्त्रोची ही दुसरी गगनभरारी ठरणार आहे. याआधी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी इस्त्रोने एकाच वेळी 104 उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्याचा विक्रम केला आहे. पीएसएलव्ही 37 या सिद्धहस्त अग्निबाणाच्या एकाच उड्डाणात तब्बल 104 उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये एकाच वेळी यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) नवे यशोशिखर गाठत भारताची मान आणखी ताठ केली आहे. 

आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. तसेच शेती आणि पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील इस्त्रोने प्रयत्नशील असून, कर्नाटकाच्या स्टेट कॉफी बोर्डाने राज्यातल्या कॉफीच्या शेतीसाठी इस्त्रोशी करार केला आहे. या करारानुसार राज्यात एकूण किती हेक्टर क्षेत्रावर कॉफीचे उत्पादन घ्यावे याची माहिती इस्त्रो रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाद्वारे देणार आहे. उत्तर-पूर्वेच्या राज्यांनाही ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशात पाण्याचे किती स्त्रोत आहेत, याची माहितीही इस्त्रो देणार असून, आंध्र प्रदेश सरकारने यासाठी करार केला आहे.