नवी दिल्ली- भारताची अवकाश संशोधन संस्था(इस्रो) देशाच्या सामरिक दृष्टीनंही महत्त्वाची आहे. ISROच्या सॅटेलाइट पाकिस्तानच्या 87 टक्के भागावर नजर ठेवून आहेत. तसेच पाकिस्तानच्या प्रत्येक भागाची HD क्वॉलिटीचे मॅपिंग इस्रो करू शकते. बालाकोट एअर स्ट्राइकसारख्या ऑपरेशनमध्येही इस्रोनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय सॅटेलाइट पाकिस्तानच्या जवळपास 8.8 लाख वर्ग किलोमीटर भूभागापैकी 7.7 लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानच्या भूभागाचे भारतीय लष्कराला 0.65 मीटरपर्यंतचे एचडी फोटो मिळत असतात. भारताची ही क्षमता दुसऱ्या शेजारी देशांसाठीही फायदेशीर आहे. आपले सॅटेलाइट 14 देशांतील जवळपास 55 लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवू शकते. परंतु चीनसंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही.सूत्रांच्या माहितीनुसार, हे फोटो कार्टोसेट सॅटेलाइटनं घेतले जाते. 17 जानेवारीला अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं की, भारत पाकिस्तानच्या घरांमध्ये डोकावू शकतो आणि हा काही चेष्टेचा विषय नाही. भारताची इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम पाकिस्तानमधली छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे. भारतीय एअरफोर्सही इस्रोवर खूश आहे.एका एअर मार्शलनं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, आमची सॅटेलाइटची 70 टक्के गरज आधीच पूर्ण झाली आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत. ज्या मोठ्या सॅटेलाइट्स सुरक्षा दलांच्या सहाय्यक आहेत, त्यामध्ये कार्टोसेट सीरिजची सॅटेलाइट, GSAT-7 आणि 7A, IRNSS, मायक्रोसॅट, रिसॅट आणि HysISचा समावेश आहे. 10हून अधिक ऑपरेशनल सॅटेलाइट्सचा सेनेने वापर केला आहे. कार्टोसेट पहिला मोठा वापर सप्टेंबर 2016ला LoCवर सर्जिकल स्ट्राइकसाठी केला गेला होता.
पाकिस्तानवर इस्रोचा तिसरा डोळा; सर्व संवेदनशील माहिती होणार गोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 8:17 PM