ISRO ka Spadex Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही क्षेपणास्त्राच्या सहाय्याने स्पेडेक्स मिशनचे (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) यशस्वीपणे प्रक्षेपण केले. ३० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पीएसएलव्ही सी ६० हे क्षेपणास्त्र अवकाश झेपावले. स्पेडेक्स मिशन भारताच्या अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. (ISRO launches PSLV-C60 for Space Docking Experiment)
इस्रोची स्पेडेक्स मोहीम भारताचे अंतराळ स्टेशन आणि चांद्रयान -४ मिशन यश निश्चित करेल. त्यामुळेच स्पेडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण महत्त्वाचे मानले जात होते.
काय आहे इस्रोचे स्पेडेक्स मिशन?
स्पेडेक्स मिशनमध्ये दोन सॅटेलाईट आहेत. पहिले आहे चेसर आणि दुसरे टार्गेट. चेसर सॅटेलाईट टार्गेटला पकडेल. त्यांच्यासोबत जोडणी (डॉकिंग) करेल. त्याशिवाय यात एक महत्त्वाची चाचणी होऊ शकते. सॅटेलाईटमधून एक रोबोटिक शस्त्र निघेल आणि ते आकड्या सहाय्याने टार्गेटला आपल्याकडे खेचतील. (हे कसं असेल समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा)
या प्रयोगामुळे भविष्यात इस्रोला कक्षा सोडून दुसऱ्या दिशेने जात असलेल्या सॅटेलाईटला परत कक्षेत आणण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर कक्षेमध्ये सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होईल. स्पेडेक्स मिशनमध्ये दोन वेगवेगळे स्पेसक्राफ्ट अंतराळात जोडून दाखवले जाणार आहेत.
भारत बनेल चौथा देश
इस्रोने सांगितले की, ही तंत्रज्ञान अशा वेळी खूप गरजेचे आहे, जेव्हा एकाच मोहिमेसाठी अनेक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्याची गरज पडते. ही मोहीम यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत अमेरिका, चीन, रशियाकडे हे तंत्रज्ञान आहे.