बंगलोर : हिंद-प्रशांत क्षेत्रात क्वाड देशांत संबंध मजबूत होत असतानाच भारत या समूहाच्या तीन अन्य देशांशी (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) अंतराळ संबंधही मजबूत करणार आहे. विशेष म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद (क्वाड)ची मागील आठवड्यात पहिली डिजिटल शिखर बैठक झाली होती.अधिकाऱ्यांनी सांगितले की, चारही देश कार्य समूहांची एक शृंखला स्थापित करणार असून, जलवायू परिवर्तन, महत्त्वपूर्ण व उगवत्या तंत्रज्ञानाचे तसेच भविष्यातील काही महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला संयुक्तरीत्या विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संयुक्त नासा-इस्रो एसएआर (निसार) मोहिमेंतर्गत मागील आठवड्यात अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीसाठी एस-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) पाठविले. नासाने दिलेल्या माहितीनुसार, निसार ही अशा प्रकारची पहिली उपग्रह मोहीम असेल, ज्यामध्ये दोन विभिन्न रडार फ्रिक्वेन्सी (ए-बँड व एस-बँड)चा वापर केला जाणार आहे. या मोहिमेत २०२२ मध्ये इस्रो श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे. तसेच ११ मार्च रोजी इस्रो व जपानच्या अंतराळ संस्थेने (जाक्सा) पृथ्वीवर निगराणी, चंद्रासंबंधी मोहीम व उपग्रह दिशा-निर्देशनात करण्यात येणाऱ्या सहकार्याचा आढावा घेतला. इस्रो व जाक्साने २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन कार्यासाठी संयुक्त चंद्र ध्रुव संशोधन मोहिमेची योजना तयार केली आहे.
- फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे. - अशा प्रकारे क्वाड देश हिंद-प्रशांत क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करण्याबरोबरच अंतराळ क्षेत्रात आपले संबंध मजबूत करण्यावर भर देत आहेत.