शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

इस्रोची गगन भरारी ! ‘जीसॅट-17’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Published: June 29, 2017 10:03 AM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 -  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  अंतराळ मोहिमेत इस्रोनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट 17 चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ‘एरियन- 5’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट 17 हे अंतराळात झेपावले.
 
जीसॅट 17चे वजन जवळपास 3477 किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्‍क्‍यू सेवेसाठी जीसॅट 17 ची मदत होणार आहे. 
 
दरम्यान, नियोजित वेळाच्या काही मिनिटं उशिरानं हे उपग्रह आकाशात झेपावले.  भारतीय वेळेनुसार बुधवारी उशीरा रात्री 2.29 वाजण्याच्या सुमारास उपग्रह उड्डाण भरावयास हवे होते.  
 
जीसॅट 17 यशस्वीरित्या आकाशात झेपावल्यानंतर यासंबंधी माहिती देणारे ट्विटही एरियन स्पेसचे सीईओ स्टीफन इस्राइल यांनी केले. दरम्यान या महिन्यात इस्त्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले हे तिसरे उपग्रह आहे. 
 
23 जून - 
PSLV-C38  रॉकेटव्दारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. शुक्रवारी (23 जून ) सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी PSLV-C38 रॉकेटने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन उड्डाण भरले. त्यानंतर 16 मिनिटांनी पीएसएलव्हीने कार्टोसॅट - 2 मालिकेतील उपग्रहासह अन्य 29 नॅनो उपग्रहांना आपल्या कक्षेत सोडण्यात आले. इस्त्रोच्या पीएसएलव्हीचे हे 40 वे उड्डाण होते. 31 उपग्रहांमध्ये भारताचे दोन आणि 29 परदेशी उपग्रह आहेत. या उपग्रहांमध्ये कार्टोसॅट -2 मालिकेतील सहावा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला असून कार्टोसॅटमुळे भारताची टेहळणी क्षमता वाढणार आहे. कार्टोसॅटचे वजन 712 किलो असून, अन्य 30  उपग्रहांचे मिळून 243 किलो वजन आहे.  
15 फेब्रुवारी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.