Isro Gaganyaan: इस्रो (Isro)ने चांद्रयान-3 मिशनच्या मोठ्या यशानंतर आता गगनयान (Gaganyaan Mission) मोहिमेवर वेगाने काम सुरू केले आहे. गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. म्हणजेच, या मोहिमेद्वारे मानवाला अंतराळात पाठवले जाणार आहे. या मोहिमेसाठी इस्रोने एक मोठी कामगिरी केली आहे.
इस्रोने दिली माहितीया मोहिमेबाबत माहिती देताना ISRO ने सांगितले की, गगनयान मोहिमेसाठी लागणारे CE20 क्रायोजेनिक इंजिन तयार झाले आहे. अनेक चाचण्यांनंतर CE 20 क्रायोजेनिक इंजिनला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले असून, हा गगनयान मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचे फोटोही शेअर केले आहेत.
इस्रोने सांगितल्याप्रमाणे, गगनयान मोहिमेसाठी CE20 क्रायोजेनिक इंजिन सज्ज आहे. CE20 इंजिनच्या ग्राउंड पात्रता चाचण्यांची अंतिम फेरी 13 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली. या अंतर्गत या क्रायोजेनिक इंजिनची मानवी रेटिंग प्रक्रिया यशस्वी मानण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंजिन कसे आहे, ते पूर्णपणे तयार आहे की नाही? याबाबत सर्व चाचण्या झाल्या आहेत. आता हे इंजिन LVM3 लॉन्च व्हेइकलला उर्जा देईल.
काय आहे गगनयान मिशन ?गगनयान मोहिमेअंतर्गत इस्रो मानवाला अंतराळात पाठवण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेअंतर्गत तीन लोकांची टीम अंतराळात पाठवली जाईल आणि त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले जाईल. ISRO ची गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास, असे करणारा भारत अमेरिका, चीन आणि सोव्हिएत संघानंतरचा चौथा देश बनेल.