शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ISROची मोठी कामगिरी; दिवाळीच्या आदल्या दिवशी लॉन्च होणार सर्वात वजनदार रॉकेट, त्यासोबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 3:32 PM

ISROच्या सर्वात वजनदार रॉकेटमधून ब्रिटेनचे 36 उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.

Isro Rocket Launching: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) दिवाळीच्या एक दिवस आधी आपले सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करणार आहे. ब्रिटीश स्टार्ट अप कंपनी वनवेबचा (OneWeb) उपग्रह याच रॉकेटमधून अंतराळात सोडण्यात येणार आहे. हा उपग्रह अंतराळातून इंटरनेट सुविधा देणार आहे. एअरटेलची भारती एंटरप्राइझ कंपनी, या कंपनीत शेअर होल्डर आहे. इस्रोच्या या रॉकेटचे नाव लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM3) आहे. याला पूर्वी जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क-3 (GSLV Mk III) म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे, या रॉकेटमध्ये वनवेबचे 36 उपग्रह लॉन्च होणार आहेत. या मिशनचे नाव आहे- LVM3-M2/OneWeb India-1 मिशन आहे. रॉकेटचे प्रक्षेपण 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून होईल. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रॉकेटचा क्रायो स्टेज, इक्विपमेंट बे असेंब्ली पूर्ण झाली आहे. रॉकेटच्या वरच्या भागात उपग्रह ठेवण्यात आले असून, अंतिम परीक्षण सुरू आहे.

इस्रोचा वनवेबशी करार झाला आहे. इस्रो असे दोन प्रक्षेपण करणार आहे. म्हणजेच 23 ऑक्‍टोबरला लाँच झाल्यानंतर आणखी एक लाँच होणार आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये ते होण्याची शक्यता आहे. हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत तैनात केले जातील. हे ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह आहेत, ज्याचे नाव OneWeb Leo आहे. LVM3 रॉकेटचे हे पहिले व्यावसायिक उड्डाण आहे.

याआधी 2019 मध्ये चांद्रयान-2, 2018 मध्ये GSAT-2, 2017 मध्ये GSAT-1 आणि त्याआधी 2014 मध्ये क्रू मॉड्यूल अॅटमॉस्फेरिक री-एंट्री प्रयोग (CARE) पार पडला. या सर्व मोहिमा देशाच्या होत्या. म्हणजेच त्या सरकारी योजना होत्या. या रॉकेटमध्ये पहिल्यांदाच खासगी कंपनीचा उपग्रह आवकाशातात सोडला जाणार आहे. या रॉकेटद्वारे आतापर्यंत चार प्रक्षेपण करण्यात आले आहेत आणि चारही यशस्वी झाले आहेत. 

टॅग्स :isroइस्रो