श्रीहरिकोटा : चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रो सोमवारी पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साहाय्याने पहिला ‘एक्स-रे पोलारिमीटर’ (एक्स्पोसॅट) उपग्रह प्रक्षेपित करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कृष्णविवरांसारख्या खगोलीय रहस्य उलगडणार आहे. पीएसएलव्ही-सी-५८ प्रक्षेपकाच्या साह्याने १ जानेवारीला सकाळी ९.१० वाजता एक्स्पोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भारताचा पहिलाच उपग्रह‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) हे अंतराळातील तीव्र क्ष-किरण स्रोतांच्या ध्रुवीकरणाची तपासणी, कृष्णविवरासारख्या गूढ रचनांचे रहस्य शोधण्याचे काम करील. हे संशोधन करणारा हा भारताचा पहिला उपग्रह आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
‘नासा’नेही केला अभ्यास...अमेरिकेच्या नासाने असाच अभ्यास केला. त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘एक्स-रे पोलरीमेट्री’ मोहिमेंतर्गत सुपरनोव्हा स्फोटांचे अवशेष, कृष्णविवराचा अभ्यास केला होता.
प्रक्षेपण कसे?४४.४ मीटर उंच पीएसएलव्ही रॉकेट प्रक्षेपणानंतर २१ मिनिटांनी प्राथमिक उपग्रहाला ६५० कि.मी.च्या पृथ्वीच्या खालील कक्षेत प्रक्षेपित करील. चौथा टप्पा पुन्हा सुरू करून शास्त्रज्ञ उपग्रहाला सुमारे ३५० कि.मी. कमी उंचीवर आणतील. प्रक्षेपक हे पीएसएलव्ही-डीएल प्रकारातील असून त्याचे वजन २६० टन आहे. या मोहिमेचे आयुष्य ५ वर्षे आहे.