ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 5 - जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण आज होणार आहे. आज 5 वाजून 8 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून इस्त्रो जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करणार आहे. जीएसएलव्ही मार्क -3 मुळे भारताला दुस-या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही, तसंच चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं भारताला शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अनेक संधी निर्माण होणार आहेत. जास्त वजनाचे कम्युनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी - 19 चा जिओटीमध्ये (जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट) प्रवेश करणे जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्धेश असल्याचं इस्त्रोचे चेअरमन ए एस किरण कुमार यांनी सांगितलं आहे.
जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यासाठी जास्त वेगाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इस्त्रोने तब्बल 30 वर्ष संशोधन करत हे इंजिन तयार केलं आहे.
ISRO to launch GSLV-Mark III into geo synchronous orbit from Andhra Pradesh's Sriharikota at 5: 28 pm, today. pic.twitter.com/hnvjolbV74— ANI (@ANI_news) June 5, 2017
हे प्रक्षेपण इस्त्रोसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचं माजी प्रमुख राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे, कारण या प्रक्षेपणाद्वारे इस्त्रो प्रक्षेपण उपग्रहाची क्षमता 2.2 - 2.3 टनच्या दुप्पट करत 3.5 - 4 टन करत आहे. भारताला जर आज 2.3 टन वजनापेक्षा जास्त संपर्क उपग्रहाचं प्रक्षेपण करायचं असल्यास त्यासाठी परदेशात जावं लागंत अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली आहे. मात्र आजच्या प्रक्षेपणानंतर भारताला दुस-या देशावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही, तसंच इतर देशही आपल्याकडे येऊ लागतील.