शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

‘इस्रो’ची चांद्र्रवारी दुर्मीळ अणुइंधन शोधण्यासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 4:58 AM

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेची (इस्रो) चंद्रावरील पुढील स्वारी अणुइंधन म्हणून वापरता येऊ शकेल, अशा ‘हेलियम-३’ या दुर्मीळ मूलद्रव्याचा शोध घेण्यासाठी असणार आहे

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संघटनेची (इस्रो) चंद्रावरील पुढील स्वारी अणुइंधन म्हणून वापरता येऊ शकेल, अशा ‘हेलियम-३’ या दुर्मीळ मूलद्रव्याचा शोध घेण्यासाठी असणार आहे. आॅक्टोबरमध्ये ‘चांद्रयान-२’ मोहिमेत सोडले जाणारे ‘रोव्हर’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून पाणी व ‘हेलियम-३’चे लवलेश सापडतात का, हे शोधण्यासाठी मृदावरणाचे (क्रेस्ट) विश्लेषण करेल.आजवर कोणताही देश जेथे पोहोचला नाही, अशा चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूस आयताकृती ‘रोव्हर’ उतरेल. ‘चांद्रयान-२’ मोहिमेत शक्तिशाली अग्निबाणाने ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ अशा तीन गोष्टी चंद्रावर पाठविल्या जातील. यापैकी ‘आॅर्बिटर’ चंद्राला प्रदक्षिणा करत राहील, तर ‘लॅण्डर’ ‘रोव्हर’सह चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ‘रोव्हर’ ही सौरऊर्जेवर चालणारी सहाचाकी गाडी असेल.किमान १४ दिवसांच्या वास्तव्यात ‘रोव्हर’ने ४०० मीटर त्रिज्येच्या परिसरात फेरफटका मारून चंद्राच्या मृदावरणाचे नमुने गोळा करावेत, अशी योजना आहे. ‘रोव्हर’ने गोळा केलेली माहिती व छायाचित्रे ‘लॅण्डर’द्वारे पृथ्वीवर ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांकडे विश्लेषणासाठी पाठविली जाईल.ऊर्जा जगाला पुरून उरेल‘हेलियम-३’ हे द्रव्य पृथ्वीवर अतिदुर्मीळ असले, तरी चंद्रावर ते मुबलक प्रमाणात असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. याचे कारण असे की, चंद्राला पृथ्वीप्रमाणे चुंबकीय कवच नसल्याने लाखो वर्षांच्या सौरवाऱ्यांच्या माºयाने या द्रव्याचा चंद्रावर मोठा संचय असावा, असे मानले जाते. अमेरिकेच्या ‘अपोलो’नेही चंद्रावर ‘हेलियम-३’ असण्याच्या संभाव्यतेस दुजोरा मिळाला होता.चंद्रावर एक दशलक्ष मेट्रिक टन ‘हेलियम-३’ असावे, असा अंदाज आहे. यापैकी जेमतेम25%पृथ्वीवर आणणे शक्य झाले, तरी त्याचा अणुइंधन म्हणून वापर करून त्यातून जगाची २०० ते ५०० वर्षांची ऊर्जेची गरज भागू शकेल.‘हेलियम-३’चे व्यापारी मूल्य टनाला पाच अब्ज डॉलर गृहित धरले, तरी चंद्रावरून आणल्या जाऊ शकणाºया या द्रव्याचे मूल्य कित्येक लाख अब्ज डॉलर एवढे भरेल. वैज्ञानिक, व्यापारी व लष्करी उपयोगांसाठी अमूल्य नैसर्गिक द्रव्यांचा धांडोळा घेण्यासाठी माणसाची महत्त्वाकांक्षी नजर याआधीच परग्रहांवर पोहोचली आहे.अमेरिका, चीन, भारत, जपान व रशिया यासारख्या देशांची सरकारे त्यासाठी प्रयत्नांत आहेत. एलॉन मस्क, जेफ बेझोज, रिचर्ड ब्रॉस्नन असे अतिधनाढ्य उद्योगपतीही पुढे सरसावत आहेत. चंद्रावर ‘हेलियम-३’ सापडल्यास ही स्पर्धा अधिक तीव्र होईल.आम्हीनेतृत्व करू!‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान म्हणाले की, चंद्रावर‘हेलियम-३’ सापडले, तर अपरंपार ऊर्जेचा हो स्रोत पृथ्वीवर आणण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे, असे देश त्यात वरचढ राहण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला त्यापैकी एक व्हायचे नसून, नव्या मार्गाचे नेतृत्व करायचे आहे! सरकारने हिरवा कंदील दाखवायचाच अवकाश, आमची सर्व तयारी आहे!मार्ग खडतर,पर्याय महागडा‘हेलियम-३’चा वीजनिर्मितीसाठी अणुइंधन म्हणून वापर सैद्धांतिकदृष्ट्या अशक्य नसला, तरी मार्ग खडतर आहे. हा पर्याय सध्या कमालीचा महागडा आहे. सध्याचे अणुतंत्रज्ञान अणू विच्छेदनाचे आहे.‘हेलियम-३’ हे अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वापरायचे झाले, तर त्यासाठी अणू सम्मिलन (अ‍ॅटॉमिक फ्युजन) तंत्रज्ञान वापरावे लागेल. ते सध्या खूपच बाल्यावस्थेत आहे.चंद्रावरील ‘हेलियम-३’ संकलित करून ते पृथ्वीवर कसे आणायचे, हाही प्रश्न सोडविलेला नाही. हे कूटप्रश्न भविष्यात सुटले, तरी याचा खर्च कितपत परवडेल, हेही अनुत्तरित आहे. त्यावर मात करणे शक्य झाले, तर ती नव्या क्रांतीची नांदी ठरेल.‘हेलियम-३’ अन्य अणुइंधनांप्रमाणे किरणोत्सारी नाही. त्याच्या वापरानंतर टाकाऊ शिल्लकच राहात नसल्याने, आण्विक कचºयाच्या विल्हेवाटीची समस्याही उरणार नाही.

टॅग्स :isroइस्रो