नवी दिल्ली - चांद्रयान-2 मोहिमेनंतर इस्रोने आता गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. गगनयान हे भारताचं अंतराळातील पहिलं मानवी मिशन असल्याने इस्रोने यासाठी अतिशय काळजीपूर्वक तयारी सुरू केली आहे. गगनयान इस्रोची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम मानली जात आहे. मानवी अवकाशवीरांना अवकाशात पाठवण्याआधी इस्रोकडून मानवी रोबोट अवकाशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 'व्योममित्रा' असं या महिला रोबोटचे नाव असून ती माणसाप्रमाणे अवकाशात वेगवेगळे प्रयोग करणार आहे. गगनयान मिशनमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ सॅम दयाल यांनी व्योममित्रा माणसांप्रमाणे प्रयोग करणार असून आपल्याला त्याचा रिपोर्ट पाठवणार आहे. एक प्रयोग म्हणून हे करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताचं गगनयान 2022 मध्ये अवकाशात झेपावेल. या मोहिमेसाठी हवाई दलातील 4 जणांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते रशियात प्रशिक्षण घेत आहेत. या चारही जणांनी भारत आणि रशियात वैद्यकीय चाचणी दिली असून त्यात ते उत्तीर्ण झाल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. याआधी इस्रो प्रमुख के. सिवन यांनी एक जानेवारीला मिशन गगनयानवर भाष्य केलं होतं. गगनयान मोहीम आता आमचं प्राधान्य असेल, असं सिवन यांनी म्हटलं होतं.
गगनयान मिशनमधील अंतराळवीरांसाठी म्हैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं विशेष खाद्यपदार्थ तयार केले आहेत. अंतराळाचा अभ्यास करुन खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यात आली आहे. डिफेन्स फूड रिसर्च लॅबनं अंतराळवीरांसाठी एग रोल, व्हेज रोल, इडली, मूग डाळ हलवा आणि व्हेज पुलाव हे पदार्थ तयार केले आहेत. याशिवाय अंतराळवीरांसाठी विशेष ज्युसदेखील तयार केले गेले आहेत. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं. त्याचा संपूर्ण विचार करून या पदार्थांची आणि पेयांची निर्मिती करण्यात आली आहे. मिशन गगनयानसाठी विशेष भांडी आणि अन्न गरम करण्यासाठी फूड हिटरदेखील तयार केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड
Delhi Election : काँग्रेसपाठोपाठ भाजपाकडून स्टार प्रचारकांची घोषणा; मोदी अन् शहा करणार प्रचार
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना
ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश