चेन्नई : नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारी इस्रो आता जागतिक विक्रम करणार असून, एकाच वेळी एका रॉकेटच्या माध्यमातून ८३ उपग्रह सोडण्याचे विचार सुरू आहे. यामध्ये केवळ दोन भारतीय उपग्रह असतील आणि उर्वरित ८१ उपग्रह परदेशी कंपन्यांचे आहेत. यातील बहुतांश उपग्रहांचा आकार छोटा असेल.एकाच वेळी भरघोस उपग्रह अवकाशात सोडणे तसे अवघड नसले तरी त्यांना वेगवेगळ्या कक्षेत नेऊन ठेवणे हे इस्रोसमोरचे मोठे आव्हान असेल.
इस्रो करणार जागतिक विक्रम
By admin | Published: October 29, 2016 4:39 AM