शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

धर्मांतराच्या मुद्यावरून कोंडी कायम

By admin | Published: December 19, 2014 4:16 AM

बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर विरोधी पक्ष कायम

नवी दिल्ली : बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर द्यावे, या मागणीवर विरोधी पक्ष कायम राहिल्यामुळे गुरुवारी लागोपाठ चौथ्या दिवशी राज्यसभेचे कामकाज ठप्प पडले. आपण चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र उत्तर संबंधित मंत्रीच देणार, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे धर्मांतर मुद्यावरून निर्माण झालेली कोंडी फुटू शकली नाही.सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी धर्मांतर मुद्यावर चर्चा करण्याची आणि या चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित होते. या मागणीवर बोलताना सभागृहाचे नेते अरुण जेटली म्हणाले, सरकार चर्चा करण्यास तयार आहे. परंतु चर्चा कशाप्रकारे व्हावी आणि उत्तर कुणी द्यावे, हे विरोधी पक्ष कसे काय ठरवू शकतात? सरकारला चर्चा करण्यास कसलीही अडचण नाही. तुम्ही नियम २६७ अन्वये चर्चा करण्यास तयार असाल तर चर्चा सुरू करा.बळजबरीने करण्यात येत असलेल्या धर्मांतरामुळे देशात गंभीर समस्या निर्माण झालेली आहे, असे विरोधी पक्षांचे सदस्य म्हणाले. परंतु देश शांत आहे. काही लोक हा मुद्दा उपस्थित करून गोंधळ निर्माण करीत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि कुणी कायदा मोडला असेल तर राज्य सरकारने त्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे, असे संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू म्हणाले.बसपा नेत्या मायावती म्हणाल्या, विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे. त्यांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नये. यादरम्यान सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)