नवी दिल्ली : डिझेल पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सरकारने वाढ केल्याचा मुद्दा राज्यसभेत गाजला. काँग्रेस उपनेते आनंद शर्मांनी या विषयाकडे लक्ष वेधीत सरकारची जोरदार हजेरी घेतली. विरोधकांच्या आक्षेपांचे उत्तर देतांना अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव उतरले आहेत हे खरे. त्याचा लाभ उठवण्यासाठीच सरकारने बुधवारी दिड महिन्यात दुसऱ्यांदा पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे ३0 पैसे व १ रूपया १७ पैशांची वाढ केली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत सरकारच्या तिजोरीत त्यातून २५00 कोटींची भर पडणार आहे. खर्चातली तूट भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या विषयावर चर्चा सुरू असतांना चार दिवसात प्रथमच राज्यसभेत शांततेचे वातावरण होते.(विशेष प्रतिनिधी)याखेरीज अरूणाचल प्रदेशच्या राज्यपालांनी राज्यात सरकारला विश्वासात न घेता परस्पर विधानसभेचे अधिवेशन बोलावल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांची सलग दुसऱ्या दिवशीही दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली.सरकारची नफेखोरीआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव ३५ डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. जनतेला त्याचा थेट लाभ मिळू न देता सरकारने नफेबाजी चालवली असून. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर उधळपट्टी करण्याकरता हे पैसे खर्च होत असल्याचा आरोप शर्मांनी केला. सपचे रामगोपाल यादव, जद(यु)चे शरद यादव, भाकपचे डी.राजा, बसपचे सतिशचंद्र मिश्रा आदींनीही याच विषयावर सरकारला धारेवर धरले.
डिझेल-पेट्रोल उत्पादन शुल्काचा मुद्दा गाजला
By admin | Published: December 17, 2015 1:06 AM