ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ - गुलबर्ग सोसायटी प्रकरणात न्यायालयाच्या निकालाने माझे समाधान झालेले नाही. मी माझ्या वकिलांबरोबर पुन्हा चर्चा करेन. याला न्याय म्हणता येणार नाही. अशी प्रतिक्रिया झाकीया जाफरी यांनी न्यायालयाच्या निकालावर बोलताना दिली.
गुजरात दंगलीमध्ये गुलबर्ग सोसायटीवर जमावाने हल्ला केला होता. त्यावेळी हिंसक जमावाने झाकीया यांचे पती काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची हत्या केली होती. इतक्या लोकांची हत्या झाल्यानंतर १२ आरोपीचं दोषी कसे ?. माझी लढाई इथे संपलेली नाही. सर्वांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.
याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या तीस्ता सटेलवाड यांनीही निकालावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निकालाचे स्वागत करतो पण आम्ही निराश आहोत. ज्यांना कमी शिक्षा झाली आहे त्यांच्या शिक्षेला पुन्हा आव्हान देऊ असे सटेलवाड यांनी सांगितले.
I am not satisfied, I am not happy. I will have to consult my lawyers again, this is not justice: Zakia Jafri #GulbargVerdict— ANI (@ANI_news) June 17, 2016