नवी दिल्ली: केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे, असा मेसेज तुम्हाला आला आहे का? जर तुम्हाला असा प्रकारचा कोणाताही मेसेज आला असले तर साधव राहा. या मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे. या मेसेजसोबत एक लिंक देखील आहे. सरकारने पीआयबीच्या (PIB Fact Check) माध्यमातून ट्विट करून यासंदर्भातील बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ऑफिशियल ट्विटरवर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त एक लिंक देखील दिलेली आहे. मात्र, ही लिंक फेक असून सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही, असे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे.
तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू शकता फॅक्ट चेकजर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.