नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्वच्छतेवर भर दिला आणि विकासाचा व महान वैज्ञानिकांचा उल्लेख करत स्पष्ट केले की, सर्वच क्षेत्रात महिलांची समान भागीदारी निश्चित करणे आमचे कर्तव्य आणि न्यू इंडियाचे स्वप्न आहे.८ मार्च रोजीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उल्लेख करुन मोदी म्हणाले की, सामाजिक, आर्थिक आदी सर्वच क्षेत्रात महिलांची भागीदारी निश्चित करणे आमचे कर्तव्य आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांकडून जे पाउले उचलण्यात येत आहेत त्याची स्तुतीकरुन झारखंडमधील१५ लाख महिलांचे त्यांनी कौतुक केले ज्यांनी एक महिन्यापर्यंत स्वच्छता मोहिम राबविली. गोबर गॅसला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
महिलांची समान भागीदारी निश्चित करणे कर्तव्यच, ‘मन की बात’मध्ये मोदी यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:45 PM