ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - जीएसटीची प्रक्रिया देशात दीर्घकाळ चालू होती. ती सुरू झाली तेव्हाही मला खात्री होती की आज ना उद्या जीएसटी अस्तित्वात येणारच आहे, असे उद्गार काढणा-या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जीएसटीची 14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे, याविषयी सेंट्रल हॉलला संबोधित करताना समाधान व्यक्त केले. 8 सप्टेंबर 2016ला संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक पास झालं होतं. 2011मध्ये मी स्वतः घटना दुरुस्तीचे विधेयक मांडले होते. या विधेयकाशी माझा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध राहिला आहे. जीएसटी लागू होणे अटळ असल्याचा मला दृढ विश्वास आहे. आज ना उद्या जीएसटी लागू होईल, याची मला खात्री होती. राज्ये आणि केंद्राच्या परस्पर सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. संकुचित मतभेद बाजूला ठेवून राज्ये आणि केंद्र सरकारनं सहमतीनं काम केल्यानं जीएसटी साकारणं शक्य झाल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपतींनी काढले.
ये तो होना ही था - राष्ट्रपती
By admin | Published: July 01, 2017 12:20 AM
14 वर्षांची यात्रा सुफळ आणि संपूर्ण होत आहे.
(जीएसटी म्हणजे गुड अँड सिम्पल टॅक्स- नरेंद्र मोदी)