Parliament Session : आज संसदीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात विविध मुद्द्यांवरुन केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि शंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेस सध्या अभय मुद्रेमध्ये आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हिंसाचारात गुंतल्याची टीकाही केली.
भगवान शंकराच्या फोटोसह राहुल गांधींनी कुराणचा उल्लेख केला, गुरु नानक आणि येशूंचा फोटोही दाखवला. ते म्हणाले की, कुराणात लिहिले आहे, घाबरू नका. येशू म्हणतात घाबरू नका आणि कुणालाही घाबरवू नका. सर्व धर्मग्रंथांमध्ये अहिंसेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येकजण अहिंसेबद्दल, भीती घालवण्याबद्दल बोलले आहेत. आपला देश अहिंसेचा देश आहे. अहिंसा हे हिंदूंचे प्रतीक आहे, पण सध्या सत्तेत असलेले हिंदू नाहीत. दुसरीकडे स्वतःला हिंदू म्हणवून घेणारेच चोवीस तास हिंसाचार आणि द्वेषात गुंतले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली. त्यांच्या या विधानावर लोकसभेत गदारोळ.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर पीएम मोदींचा पलटवार...राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावळी स्वतः पीएम मोदी त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि राहुल यांचे वक्तव्य गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, पीएम मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही.
अमित शाहंनी केली माफी मागणीराहुल गांधींच्या भाषणाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाही म्हणाले की, इस्लाममधील अभय मुद्रेबाबत त्यांनी इस्लामच्या तज्ज्ञांचे मत घ्यावे. गुरू नानक यांच्या अभय मुद्रेबाबत गुरुद्वारा समितीचे मतही घ्यावे. अभयबद्दल बोलणाऱ्या लोकांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला घाबरवले होते. आणीबाणीच्या काळात दिल्लीत दिवसाढवळ्या हजारो शीख नागरिकांची हत्या करण्यात आली होती. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणाबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.