इटानगर : अरुणाचल प्रदेशातील नवीन डोनी पोलो या देशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आदिवासी पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. राज्याची राजधानी इटानगरपासून १५ किलोमीटरवरील हॉलोंगी येथे असलेले हे विमानतळ व्यावसायिक उड्डाणांद्वारे सीमावर्ती राज्याला इतर भारतीय शहरांशी तर हेलिकॉप्टर सेवेद्वारे राज्याच्या इतर भागांशी जोडेल. मोदी यांनी पश्चिम कामेंग जिल्ह्यातील ६०० मेगावॅटचा कामेंग जलविद्युत प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. प्रकल्प ८० चौरस किमीपेक्षा जास्त क्षेत्रात ८४५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. त्यातून अरुणाचलच्या गरजेहून अधिक वीज तयार हाेईल.
आम्ही निवडणुकीसाठी नाही विकासासाठी काम करतो२०१९ मध्ये मी या विमानतळाची पायाभरणी केली होती. तेव्हा ही निवडणूक खेळी असल्याचा दावा टीकाकारांनी केला होता. आज निवडणूक नसताना आम्ही हे विमानतळ सुरू करत आहोत. ही त्यांच्यासाठी सणसणीत चपराक आहे. आधीच्या सरकारांना केवळ निवडणुका जिंकायच्या होत्या. आम्ही फक्त देशाच्या विकासासाठी काम करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विमानतळावर ६४५ कोटींचा खर्चदेशाचे पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेशात विमानतळ नव्हते. सर्वात जवळची हवाई सुविधा लीलाबारी विमानतळ येथे आहे. तो आसामच्या उत्तर लखीमपूर जिल्ह्यात ८० किमी अंतरावर आहे. तथापि, पासीघाट व तेजूसह राज्यात काही प्रगत लँडिंग ग्राउंड आहेत.
‘लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत’ nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. nत्यांनी दाखवलेले धैर्य व दिलेले अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. वसाहतवादी राजवटीला त्यांनी केलेल्या दृढ विरोधामुळे त्या प्रेरणास्रोत आहेत,” असे मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.