बस उशिरा धावल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजच उशीर
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
पिंपळगाव बसवंत : येथील आगारातील वेळेचे बंधन न पाळता कधी वाहक तर कधी चालक कधी दोघेही नाही. अशी परिस्थिती पिंपळगाव बस डेपोची झाली असून, बसच्या या उशिरा धावण्यामुळे दावचवाडी, लोणवाडी, कुंदेवाडी, रौळस आदि गावांतून निफाडला जाणारे महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना तासाला दांडी बसत आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील आगारातील वेळेचे बंधन न पाळता कधी वाहक तर कधी चालक कधी दोघेही नाही. अशी परिस्थिती पिंपळगाव बस डेपोची झाली असून, बसच्या या उशिरा धावण्यामुळे दावचवाडी, लोणवाडी, कुंदेवाडी, रौळस आदि गावांतून निफाडला जाणारे महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना तासाला दांडी बसत आहे. तक्रार केल्यास दोन दिवस गाडी वेळेत धावते. मात्र पुन्हा तेच होत असल्याने विद्यार्थी त्रासून गेले आहे. आता तक्रारी कोणाकडे आणि कितीवेळा करावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. बस डेपोच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांना बस म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशी परिस्थिती विद्यार्थ्यांची झाली आहे. पिंपळगाव बसवंत आगारातून सुटणार्या निफाडच्या बस नेहमी उशिराने धावतात. कॉलेजनेही तक्रारी केल्या आहेत. मात्र नियम दोन दिवस पाळतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते ही सत्य परिस्थिती नसून ५० ते ६० विद्यार्थ्यांसाठी कॉलेजची वेळ बदलणेही शक्य नाही. विद्यार्थ्यांचे कधी पहिला तर कधी दोन तास बुडले जातात. (वार्ताहर)