शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

नव्या पिढीत कलागुण रूजवणे आवश्यक : सावळ

By admin | Published: May 05, 2015 1:21 AM

डिचोली : ज्या कलेत किंवा क्षेत्रात आपण कार्य करतो त्या कलेत वा क्षेत्रात आपण अव्वल क्रमांकावर जाणार त्याच प्रखर इच्छेने आपण पुढे जात असताना स्वत:ला कधीही कमी लेखू नये. भजन, किर्तन सोडून आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आकर्षण होत आहे. या स्थितीत आज युवा कलाकारांना या कलेकडे आकर्षित करून त्याचंया या कलेचे गुण रुजविणे आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी कुडणे येथे कै. पं. मधुकर च्यारी स्मरणार्थ आयोजित संगीत संमेलनाच्या उद्गाघटन प्रसंगी केले.

डिचोली : ज्या कलेत किंवा क्षेत्रात आपण कार्य करतो त्या कलेत वा क्षेत्रात आपण अव्वल क्रमांकावर जाणार त्याच प्रखर इच्छेने आपण पुढे जात असताना स्वत:ला कधीही कमी लेखू नये. भजन, किर्तन सोडून आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आकर्षण होत आहे. या स्थितीत आज युवा कलाकारांना या कलेकडे आकर्षित करून त्याचंया या कलेचे गुण रुजविणे आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी कुडणे येथे कै. पं. मधुकर च्यारी स्मरणार्थ आयोजित संगीत संमेलनाच्या उद्गाघटन प्रसंगी केले.
साखळी येथील ओंकार क्रिएशन सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे श्री कुडणेश्वर देवस्थान मंडप कुडणे-साखळी येथे आयोजित या संगीत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कुडचणेचे प्रभारी सरपंच सुरेश कामत, पाळीच्या झेडपी सदस्या शुभेच्छा गावस, कुडणेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष भिवा मळीक, माधवी च्यारी, ओंकार क्रिएशनच्या अध्यक्षा निशा पोकळे आदींची उपस्थिती होती.
आपल्या कलेतील प्राविण्य जनमानसात रूजविताना तसेच सर्वत्र ठसा उमटविताना आपल्याबरोबर कुटुंबाचे व गावचे नाव पुढे आणणारा, गावाला ओळख देणारे व्यक्तीमत्व श्रेष्ठ असते. आज संगीत रंगभूमी ओस पडत चालली आहे. संगीत नाटकांचा मोठा अवधी आजच्या रसिकांना पचनी पडत नसल्याने प्रेक्षकांची या नाटकांकडे पाठ होत आहे. आजच्या समाजाची मानसिकता ओळखून प्रत्येक गोष्टीत समयसुचकता आणणे गरजेचे आहे. तसेच कलाकाराने आपली कला पुढे नेत असताना त्या कलाकाराला प्रोत्साहन देऊन त्याच्या कलेचे संवर्धन कला रसिक प्रेक्षक तसेच गावातील लोकांचेही कर्तव् व जबाबदारी आहे, असे आमदार नरेश सावळ यांनी पुढे म्हटले.
आज कलेच्या क्षेत्रात येणारे कलाकार नगण्यच ----------- जातो. तरूण मोठ्या पदव्या व नोकरीच्या मागे लागत आहे. मात्र उदयोन्मुख कलाकारांनी कलेच्या क्षेत्राकडे भविष्य, करियर म्हणून पहावे. ओंकार क्रिएशन सारख्या संस्थांनी अशा प्रकारचे कला संस्कृती संवर्धनाचे उपक्रम राबवावे, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य शुभेच्छा गावस यांनी केले.
कुडणे गावात अनेक कलाकार आज नावारूपास येत असल्याने त्यांना कै. पं. मधुकर च्यारी यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी आपल्याबरोबरच गावाच्या नावाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे, असे प्रभारी सरपंच सुरेश कामत यांनी म्हटले. यावेळी ज्येष्ठ संगीत कलाकार प्रभाकर मळीक, यशवंत खांडेकर, घन:श्याम माडकर व भगवंत मळीक यांचा आमदार सावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समई प्रज्वलनाने या संगीत संमेलनाचे उद्घाटन करण्यत आले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष निशा पोकळे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी तर सचिव सुषमा सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर संगीत संमेलनास प्रारंभ करण्यात आला. अनेक गायक, वादक कलाकारांनी आपापल्या कलेची प्रतिभा या संमेलनात सादर केली व उपस्थितांची वाहवा मिळविली.
फोटो : कै. पं. मधुकर च्यारी स्मृती संगीत संमेलनाचे उद्घाटन करताना आमदार नरेश सावळ, बाजूला शुभेच्छा गावस, निशा पोकळे, माधव च्यारी, सिद्धार्थ मळीक, सुरेश कामत, भिवा मळीक व इतर.
२) संमेलनात सत्कार करण्यात आलेल्या ज्येष्ठ कलाकार प्रभाकर मळीक, यशवंत खांडेकर, धन:श्याम माडकर व भगवंत मळीक यांच्या समवेत आमदार नरेश सावळ, शुभेच्छा गावस, निशा पोकळे व इतर.
३) संमेलनाच्या उद्घाटनानंतर भजन सादर करताना गणेश पार्सेकर, विठ्ठल शिरोडकर, प्रकाश कोरगावकर व साथी कलाकार. (छाया : विशांत वझे)