नवी दिल्ली : वातावरण बदलाच्या दुष्परिणामांनी संपूर्ण जगाला चिंतेच्या खाईत ढकलले आहे. पृथ्वीचे तापमान नियंत्रणात राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नैसर्गिक संकटे आणि अन्य विनाशकारी परिणामांना तोंड देण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या संस्थेने वैज्ञानिक पद्धतीने काम करायला हवे, असे मोदींनी वातावरण बदलासंबंधी पॅरिस येथे होणाऱ्या शिखर बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी मन की बात कार्यक्रमात स्पष्ट केले.आज वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा सुरू आहे. चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक काम करण्यापूर्वी त्याला दर्जात्मक स्वीकृती मिळत आहे. पृथ्वीचे तापमान वाढू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी व चिंता आहे. ऊर्जा संरक्षण हा तापमानवाढीपासून बचावाचा पहिला मार्ग आहे. आज जगाच्या काना-कोपऱ्यातून नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत असतात. झपाट्याने होत असलेल्या वातावरण बदलाचा परिणाम दिसू लागला आहे. अलीकडेच तामिळनाडूत आणि अन्य काही राज्यांमध्ये मुसळधार पावसात मोठे नुकसान झाले आहे. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोकसंवदेना व्यक्त करतो.(लोकमत न्यूज नेटवर्क)
पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी
By admin | Published: November 30, 2015 1:13 AM