Narendra Modi Loksabha Speech: तुम्हालाच १०० वर्षे सत्तेत यायचं नाहीए असं दिसतंय, त्यामुळे मी तयारी करून ठेवलीयः नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:23 PM2022-02-07T18:23:36+5:302022-02-07T18:29:51+5:30
आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे, पंतप्रधानांचं वक्तव्य
लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांनी संसदर सदस्यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले विचार मांडल्याबाबत आभारही व्यक्त केले. तुम्हीच १०० वर्षे सत्तेत यायचं नाही याबाबत मन तयार केलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला.
"तुम्ही ज्या पद्धतीची विधानं करताय आणि वागताय, ते पाहता १०० वर्षं सत्तेत यायचं नसल्याचं तुम्ही मनातून पक्कं केलंय असं वाटतं. आता तुम्हीच तयार आहात, तर मीही तयारी करून ठेवलीय," असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. थोडी जरी आशा असती किंवा जनता आपल्या परत आणेल अशी जरी आशा असती तर असं केलं नसतं, असंही ते म्हणाले.
कोरोना काळानंतरही जग नव्या व्यवस्थेच्या मार्गाकडे जात आहे. भारताला या प्रकरणी मागे राहायचं नाही. भारतानं ही संधी गामावू नये, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.
You can oppose me, but why are you (Congress) opposing the Fit India Movement and other schemes? No wonder you were voted out in many states years ago...I think you have made up your mind not to come to power for the next 100 years: PM pic.twitter.com/APo12ubXcI
— ANI (@ANI) February 7, 2022
हल्ली सरकारी योजनांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जाते. जर तुम्ही जनतेच्या मध्ये राहीला असता तर या गोष्टी दिसतात. परंतु तुमचा काटा २०१४ वरच अडकलाय. देशाच्या जनतेनं तुम्हाला ओळखलं. इतका उपदेश देताना तुम्हालाही देशाच्या जनतेनं ५० वर्षे या ठिकाणी बसण्याची संधी दिली होती हे विसरता असंही मोदी यावेळी म्हणाले.