लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांनी संसदर सदस्यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले विचार मांडल्याबाबत आभारही व्यक्त केले. तुम्हीच १०० वर्षे सत्तेत यायचं नाही याबाबत मन तयार केलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला.
"तुम्ही ज्या पद्धतीची विधानं करताय आणि वागताय, ते पाहता १०० वर्षं सत्तेत यायचं नसल्याचं तुम्ही मनातून पक्कं केलंय असं वाटतं. आता तुम्हीच तयार आहात, तर मीही तयारी करून ठेवलीय," असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. थोडी जरी आशा असती किंवा जनता आपल्या परत आणेल अशी जरी आशा असती तर असं केलं नसतं, असंही ते म्हणाले.
कोरोना काळानंतरही जग नव्या व्यवस्थेच्या मार्गाकडे जात आहे. भारताला या प्रकरणी मागे राहायचं नाही. भारतानं ही संधी गामावू नये, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.