नवी दिल्ली-
'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसंच कर्मचाऱ्यांना कार्यालयसोडून घरी जाण्यास सांगण्यात आलं आहे. बीबीसीच्या लंडनमधील मुख्यालयाला देखील दिल्लीतील कार्यालयाच्या सर्व्हेची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीत बीबीसीच्या कार्यालयाचा आयकर विभागाकडून सर्व्हे केला जात असल्याचं केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं देखील दिलं आहे. दुसरीकडे या छापेमारीला काँग्रेसनं बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर घातलेल्या बंदीशी जोडलं आहे. "आधी बीबीसीची डॉक्युमेंट्री आली आणि त्यावर बंदी घातली गेली. मग बीबीसीवर इन्कम टॅक्सचा छापा टाकला गेला. अघोषित आणीबाणी", असं ट्विट काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.