जि.प.कर्मचार्यांवर उसनवारीने दिवाळी साजरी करण्याची वेळ
By admin | Published: November 03, 2015 11:45 PM
जळगाव- जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत आदी विभागांमध्ये कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे.
जळगाव- जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत आदी विभागांमध्ये कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. वित्त विभागासह सामान्य प्रशासन विभागात कार्यरत कर्मचार्यांचे वेतन मात्र वेळेत काढले जाते. या दुटप्पी भूमिकेमुळे जि.प.च्या इतर कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. दसरा सणालाही कर्मचार्यांना वेतन मिळाले नव्हते. आता दिवाळी तोंडावर आली आहे. ९ तारखेपासून दिवाळीला सुरुवात होईल. त्यामुळे किमान दोन दिवसात या कर्मचार्यांना वेतन मिळायला हवे. अन्यथा उधार उसनवारी करून दिवाळी साजरी करण्याशिवाय या कर्मचार्यांसमोर पर्याय नाही. ज्या विभागातील कर्मचार्यांचे वेतन उशीरा होईल त्या विभागातील प्रमुखांना जबाबदार धरण्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु वेतन रखडतच आहे, पण त्याबाबत कुणालाही दोषी धरून गतीने कार्यवाही करण्यास जि.प.प्रशासन तयार नाही.