श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संदेशवहनाच्या नव्या पर्वात पदार्पण करीत शुक्रवारी रात्री श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही- सी २८ या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून १४४० किलो वजनाचे पाच ब्रिटिश उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केली. इस्त्रोची ही आजवरची सर्वात अवजड व्यावसायिक अंतराळ मोहीम आहे. रात्रीचा अंधार भेदत पीएसएव्ही-सी-२८ हे उपग्रह प्रक्षेपण वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी रात्री ९.५८ वाजता अंतराळात झेपावले. त्यानंतर २० मिनिटांनी हे पाचही उपग्रह सौर-समकालीन कक्षेत स्थिर करण्यात आले. ही अत्यंत यशस्वी मोहीम ठरली, अशा शब्दात इस्त्रोचे चेअरमन किरण कुमार यांनी आनंद व्यक्त केला. नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनीही यावेळी एकमेकांचे अभिनंदन करीत जल्लोष केला.
इस्त्रोची घे भरारी, पाच ब्रिटीश उपग्रहांसह PSLV - C २८ झेपावले
By admin | Published: July 11, 2015 3:40 AM