मोहिमेचा खर्च :९७८ कोटी रु. यापैकी ३७५ कोटी रु. प्रक्षेपणासाठी व ६०३ कोटी रु. अन्य साधनांचा खर्च.मोहिमेत ‘इस्रो’खेरीज ५०० विद्यापीठे, संशोधन संस्था व १२० खासगी उद्योगांचा सहभाग. मोहिमेचा कालावधी सात आठवडे.१५ जुलै यानाचे चंद्राकडे प्रस्थान. ६/७ सप्टेंबर ‘लॅण्डर’व ‘रोव्हर’चे अलगदपणे चंद्रावर उतरणे.चांद्रवारीतील प्रमुख टप्पेच्१५ जुलै पहाटे२.५१ ला यानाचे उड्डाण.च्पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणकक्षेच्या बाहेर गेल्यानंतर१६ दिवस ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ याना पुढील प्रवासासाठी योग्य उंचीवरील कक्षेत नेण्याचे काम.च्त्यापुढील पाच दिवस या तिन्ही साधनांचे एकत्रित गोठोडे ३.५ लाख किमीचा प्रवास करून चंद्राच्या कक्षात पोहोचेल.च्चंद्राच्या कक्षेत सुयोग्य स्थानी गेल्यावर ‘आॅर्बिटर’पासून ‘लॅण्डर’व ‘रोव्हर’ विलग होईल.च्पुढील चार दिवस एकीकडे ‘आॅर्बिटर’ व दुसरीकडे ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’च्या चंद्राभोवती घिरट्या.च्चंद्रापासून ३० किमी अंतरावर पोहोचल्यावर ‘लॅण्डर’चे ‘रोव्हर’ला सोबत घेऊन चंद्राच्या दिशेने उतरणे सुरु.च्१५ मिनिटांनी ही दोन्ही साधने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पूर्व नियोजित स्थळी अलगद उतरणे अपेक्षित.च्चंद्रावर उतरल्यानंतर ‘लॅण्डर’पासून ‘रोव्हर’चे विलगीकरण.च्सेकंदाला दोन सेंमी या वेगाने ‘रोव्हर’चा चंद्रावर ५०० मीटरचा फेरफटका.च्‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’चे आयुष्य एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस.च्‘आॅर्बिटर’चे आयुष्य एक वर्ष. तेवढा काळ ते चंद्राभोवती घिरट्या घालत राहील.यानाचे वजन : ३.८ टन. अग्निबाणाखेरीज ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ हे प्रमुख भाग.
असे असेल चांद्रयान-२
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 6:57 AM