अहमदाबाद : जगाच्या पार्श्वभूमीवर देशाला पुन्हा सुस्थितीला नेण्यासाठी पुढची ५ वर्षे द्यावी लागतील,असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे काढले. भाजपच्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सुरत मधील दुर्घटनेच्या पाशर््वभूमीवर हा समारंभ साधेपणे झाला. ते म्हणाले की, पुढची ५ वर्षे देशाच्या इतिहासात महत्वाची आहेत. भूतकाळात देशाचे जगाच्या नकाशावर जे स्थान होते, ते पुन्हा निर्माण करण्यासाठी आगामी काळ महत्वाचा आहे.मोदी यांनी आगीच्या दुर्घटनेमुळे मरण पावलेल्या २२ विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, जी मुले दुर्घटनेत मरण पावली, त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख कमी होऊ शकेल, असे शब्दच नाहीत. दुसऱ्या बाजूला गुजरातमधील जनतेचे आभार व्यक्त करायचे होते. माझ्या आईचे आशिर्वाद घेणे हेही कर्तव्य होते.>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरजवळील रायसान गावातील वृंदावन बंगल्यात त्यांचे धाकटे बंधू पंकज यांच्यासोबत राहात असलेल्या आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले. गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि पंतप्रधानपदाचाशपथविधी होण्याच्या आधीही नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातेचे आशीर्वाद घेतले होते.
देश सुस्थितीत नेण्यासाठी ५ वर्षे लागणार - मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:01 AM