ठळक मुद्देदोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जेंटिलोनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतील.भारतामध्ये आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जेंटिलोनी यांची भेट घेतली आणि विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे.
नवी दिल्ली- इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटिलोनी यांचे आज भारतामध्ये आगमन झाले आहे. नवी दिल्लीमध्ये त्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जेंटिलोनी यांनी भारतीय जवानांकडून मानवंदना स्वीकारल्यावर दौऱ्यास सुरुवात झाली. 2007 साली इटलीचे तत्कालीन पंतप्रधान रोमॅनो पोडी यांच्या भारतभेटीनंतर दशकभरामध्ये झालेला हा इटलीच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा ठरणार आहे.भारतामध्ये आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जेंटिलोनी यांची भेट घेतली आणि विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीटरवर माहिती दिली आहे.2018 साली भारत आणि इटली यांच्या संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जेंटिलोनी यांचा भारतदौरा अत्यंत मह्त्त्वाचा ठरणारा आहे. भारत आणि इटली आपले संबंध नव्याने स्थापित करत असल्याचे मत जेंटिलोनी यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले होते. पर्यटन आणि संरक्षण सामुग्रीच्या व्यापारामध्ये या भेटीमुळे वृद्धी होईल असे मतही त्यांनी या मुलखतीत मांडले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना जेंटिलोनी म्हणाले, "भारत आणि इटली यांच्यामध्ये अत्यंत भक्कम आर्थिक संबंध आहेत त्यांना अधिक बळकटी देण्याची ही संधी आहे. भारतामध्ये सुरु असलेल्या सुधारणा कार्यक्रमांचा उपयोग इटालियन व्यावसायिकांना होणार आहे. भारतीय कंपन्यांनीही इटलीमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. हे दोन्ही देश दहशतवादाविरोधात लढत आहेत त्याचप्रमाणे हवामान बदलाविरोधातही ते काम करत आहेत. लोकशाही हे आमचे सामाईक ध्येय आहे. या सर्व बाबींमुळे मी भारतभेटीवर आल्यावर आनंदी आहे. भारताबरोबरचे संबंध अदिक सुदृढ करण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले माझे मैत्री संबंध या भेटीमुळे वृद्धींगत होतील अशी मला अपेक्षा आहे.
आजोळी जाऊनही राहुलमध्ये सुधारणा नाही- अनिल विजभारतातही रेल्वे मार्ग खाजगीत देणे शक्य
या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जेंटिलोनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचीही भेट घेतील. तसेच इंडियन अॅंड इटालियन चीफ एक्झीक्युटिव्ह्जच्या अधिकाऱ्यांशीही ते संवाद साधतील त्यानंतर ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते व्याख्यानही देतील.