नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण पुढाकार घेत असून आपापल्या परीने मदत करत आहे. याच दरम्यान अनेक कौतुकास्पद घटना समोर येत आहेत. उत्तराखंडमध्ये चीनव्याप्त तिबेट सीमेवरील चौकीवर तैनात असलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
ITBP जवानांनी एक व्यक्तीचा मृतदेह 25 किमी तब्बल 8 तास पायी प्रवास करून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला आहे. विशेष म्हणजे जवानांनी खांद्यावर हा मृतदेह नेला असून यासाठी त्यांना दुर्गम भागातून आठ तासांचा खडतर प्रवास करावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील बुगदयार चौकीजवळील सीमेवरील स्युनी या गावातील एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
आयटीबीपीच्या 14 व्या वाहिनीला तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. 30 ऑगस्टला जवानांना ही माहिती त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र जोरदार पाऊस असल्याने वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला होता. स्थानिक लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी स्यूनी येथून जवळपास 25 किमीच्या अंतरावर असलेल्या मृत व्यक्तीच्या घरी स्ट्रेचरवर खांद्यावरून मृतदेह पोहोचवला.
मुसळधार पावसामुळे रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. मात्र जवानांनी अतिशय सावधगिरीने पायी प्रवास केला. दुपारी मृतदेह घेऊन निघालेले जवान संध्याकाळी तब्बल आठ तासांचं अंतर चालून मृत्यू झालेल्या तरुणाच्या घरी पोहोचले. त्यानंतर बंगापनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर आयटीबीपी जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'मी राष्ट्रवादीचा आमदार' असं म्हणत रोहित पवारांनी केला 'या' संघटनेला विरोध
एकापेक्षा जास्त बँक खाती असणं पडू शकतं महागात, 'हे' आहे कारण
CoronaVirus News : कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, म्हणाले...
भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?