शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘आयटीआय’ला मिळणार बारावीची समकक्षता ?

By admin | Published: March 09, 2016 6:18 AM

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.

नवी दिल्ली : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणातील इयत्ता १२वीशी समकक्षता देण्यावर केंद्र सरकार सध्या विचार करीत आहे.असे झाले, तर ‘आयटीआय’मधील शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी महाविद्यालये अथवा विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास पात्र ठरतील. मात्र, यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांमधील तफावत भरून काढण्यासाठी कदाचित अशा विद्यार्थ्यांना एखादा पुरवणी अभ्यासक्रमही (ब्रिज कोर्स) करावा लागू शकेल. सूत्रांनुसार, कौशल्यविकास आणि उद्योजकता विकास मंत्रालयाने अशा आशयाचा प्रस्ताव मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविला असून, त्यावर कौशल्य विकास कार्यक्रमाशी संबंधित इतर मंत्रालयांचीही मते घेण्यात येत आहेत.‘आयटीआय’ कौशल्यविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. या मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना जाता यावे, यासाठी ‘आयटीआय’चा अभ्यासक्रम इयत्ता १२ वीशी समकक्ष मानला जावा, असे आम्हाला वाटते. आम्ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासही (सीबीएसई) तसे सांगितले आहे.या प्रस्तावावर शिक्षण मंडळांसह इतर सर्व संबंधितांशी व्यापक विचारविनिमय व्हायला हवा, असे मानव संसाधन विकास मंत्रालयास वाटते. हा प्रस्ताव प्रत्यक्षात कसा आणता येईल, याच्या औपचारिकता ठरविण्यासाठी मानव संसाधन व कौशल्यविकास या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचा एक कार्यगट स्थापन करण्यात आला असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी त्या राज्यापुरता ‘आयटीआय’ अभ्यासक्रम इयत्ता १२ वीला समकक्ष करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनांमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकले होते.देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये व आयआयटी आणि एनआयटी यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असून, सरकारी व खासगी संस्थांमधील अभियांत्रिकी पदवीच्या सुमारे आठ लाख जागा सध्या विद्यार्थ्यांअभावी रिकाम्या राहात आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणानंतर कौशल्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आयटीआयना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)