नवी दिल्ली: कोरोना संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आयकर भरणा करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आयकर भरता येईल. याआधी आयकर भरण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयकर विभागानं दिली. यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल, अशी आशा विभागाकडून व्यक्त करण्यात आली. याआधी गुरुवारी आयकर विभागानं आर्थिक वर्ष २०१९-२० साठी कर बचत गुंतवणुकीची तारीख ३१ जुलै केली होती. त्यामुळे आर्थिक वर्ष ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आलं. आयकर विभागानं घेतलेल्या नव्या निर्णयामुळे करदाते ३१ जुलैपर्यंत गुंतवणूक करून ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरू शकतात.
करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 1:01 PM
कोरोना संकटात आयकर विभागाचा महत्त्वाचा निर्णय
ठळक मुद्देआता ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर भरता येणारआयकर भरण्यासाठी मुदतवाढ; करदात्यांना मोठा दिलासाकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचा निर्णय