नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत. मात्र येथील निवडणूक आयोगाचे काम आणि इव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राजदूत म्हणाल्या की, ''भारतातील निवडणूक प्रक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सुव्यवस्थित निवडणूक आयोग आणि त्याचे प्रशिक्षित अधिकारी असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या मतदानाची व्यवस्था होऊ शकत नाही. ही एक चांगली आणि सुव्यवस्थित प्रणाली आहे.''
ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 3:02 PM