शरीर संबंध हे वैवाहिक आयुष्याची गरज असल्याचे न्यायालयांनी वेळोवेळी नमूद केलेले आहे. तसेच त्यास वारंवार नकार देणे यास क्रुरता असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रकरणांत न्यायालयाने या कारणावरून घटस्फोटांना परवानगी देखील दिली आहे. परंतु, लग्नानंतर दोन वर्षे सुहागरातच केली नाही तर... मुझफ्फरपूरमध्ये असा प्रकार घडला आहे.
एका महिलेने पतीने एकदाही शरीर संबंध ठेवला नाही म्हणून पोलिसांत धाव घेत एफआयआर दाखल केला आहे. महिला पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांना बोलविण्यात आले आहे. आता पोलीस या प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. पीडिता ही वैशाली जिल्ह्यातली लालगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणारी असून तिचा पती अहियापुर पोलीस ठाणे हद्दीत राहतो.
एफआयआरनुसार तिचे लग्न मे २०२१ मध्ये झाले होते. परंतु पतीने दोन वर्षे शरीर संबंधच ठेवले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. तेव्हा सासरच्यांना सांगितले असता त्यांनी पतीला समजावले नाही. पतीला सेक्स का करत नाही असे विचारले असता तो नेहमी शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. माहेरी जाते असे म्हटले तर घराबाहेर पाय ठेवलास तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी देत होता. अखेर आजोबांची तब्येत बिघडलीय असे सांगून जीव वाचवत माहेरी पोहोचली आहे. तेव्हापासून पती आणि सासरचे लोक सतत धमक्या देत असल्याचे या महिलेने म्हटले आहे.
महिला पोलीस ठाणा प्रमुख आदिती कुमारी यांनी सांगितले की, पतीला व त्याच्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मान्य करत नव्हते. पती आणि सासरचे लोक उलट पीडितेवरच दबाव आणू पाहत होते. अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 323, 498A, 379, 504, 506, 34 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.