ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५- व्हॉट्सअपनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व मेसेजला सुरक्षा पुरवणारं नवं व्हर्जन अस्तित्वात आणलं आहे. व्हॉट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये सुरक्षेची यंत्रणा कडक करण्यात आली आहे.
या नव्या यंत्रणेमुळे एका डिव्हाईसमधून दुस-या डिव्हाईसमध्ये मेसेजची देवाण-घेवाण केल्यास कोणतीही तिसरी व्यक्ती ते मेसेजस वाचू शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हॉट्सअप व्हर्जनच्या सुरक्षेनुसार तो मेसेज फक्त पाठवणारी आणि ज्याला तो मेसेज पाठवण्यात आला आहे, ती व्यक्तीच वाचू शकेल. तिस-या कोणालाही ते मेसेजेस व माहिती वाण्यापासून हे व्हर्जन रोखणार आहे.
या व्हर्जननुसार तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकारला ही माहिती मिळवता येणार नाही आहे. इंग्लंडमधल्या राजकारण्यांनी या यंत्रणेवर बंदी आणण्यासाठी प्रस्तावही ठेवल्याची आता माहिती मिळते आहे. कंपन्यांवर बॅकडोर हे ऍप्लिकेशन टाकण्यासाठी दबाव आणला जात असून, त्याद्वारे गुप्तचरालाही हा मेसेज वाचता येणार आहे. व्हॉट्सअॅपचे या व्हर्जनमुळे प्रत्येक डेटा सुरक्षित होणार आहे. प्रत्येक कॉल, मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल, व्हॉईस मेसेज तिस-या कोणालाही मिळवता येणार नाहीत.