नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले. मात्र काँग्रेसने या विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेत या विधेयकाला विरोध केला. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होणे ही एक ऐतिहासिक घोडचूक असल्याचे मत काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले आहे. राज्यसभेमध्ये दिवसभर झालेल्या वादळी चर्चेनंतर मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पारित झाले. हे विधेयक पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राज बब्बर म्हणाले की, ''हे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर होणे हा देशातील कुठल्याही कौटुंबिक कायद्याला बसलेला जबरदस्त धक्का आहे. या माध्यमातून दिवाणी कायद्याला फौजदारी कायदा बनवण्यात आले आहे. ही एक ऐतिहासिक घोडचूक आहे.''
ही एक ऐतिहासिक घोडचूक, तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते राज बब्बर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 7:29 PM